Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या

६० लाख युवक बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क
Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Elections) मिझोराम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कुणाचे पारडे जड राहील यावर पुढील वर्षी मार्च महिन्यात होणाऱ्या लोकसभेचा संभाव्य निकाल अवलंबून असणार आहे. परंतु, यामध्ये नवमतदार (New Voter) महत्वाची भूमिका बजावणार आहेत...

Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या
MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर 'या' तारखेला एकत्रितपणे होणार सुनावणी

या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तब्बल ६० लाख युवक पहिल्यांदाच मतदानाचा हक्क (Right to Vote) बजावणार आहेत. तर या तरुण नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता निवडणूक आयोगाने एक नवा फंडा वापरला होता. त्यामुळे आता २९०० मतदान केंद्रांचे व्यवस्थापन हे तरुणांकडूनच केले जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner Rajeev Kumar) यांनी दिली.

Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या
Pankaja Munde : पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार? समर्थकांसह राज्याचे लक्ष

दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये यंदा नव्याने नोंदणी केलेले आणि १८-१९ वय असणारे ६० लाख मतदार असणार आहेत. तर पात्रता आणि तारखांच्या दुरुस्तीमुळे सुमारे १५.३९ लाख तरुण मतदार मतदानास पात्र ठरले आहेत, असे देखील निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) सांगितले.

Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या
Shivsena Crisis : खरी शिवसेना कुणाची? ठरवण्यासाठी योग्य पुरावे सादर करा; विधीमंडळ सचिवांची शिंदे-ठाकरेंना नोटीस

मतदानासाठी आता वर्षातून चार वेळा नाव नोंदणी करता येणार

यापूर्वी मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनाच आपले नाव नोंदवता येत होते. त्यामुळे १ जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांना थेट पुढच्या वर्षीच नोंदणी करावी लागत होती. पंरतु, आता २८ जुलै २०२२ रोजी निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या बदलांनुसार वयाची १७ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी आगाऊ नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण असण्याच्या पात्रतेसाठी प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही. तसेच तरुणांना गेल्या वर्षीपासून १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या तारखांना नोंदणी करता येणे शक्य झाले. त्यामुळे यंदा १५ लाखांच्यावर नव्या मतदारांची संख्या वाढली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या
Assembly Election 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

कोणत्या राज्यात कधी मतदान?

मिझोरममध्ये ०७ नोव्हेंबर रोजी मतदान

छत्तीसगडमध्ये ०७ आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान

मध्यप्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी मतदान

राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान

तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान

निकाल

पाच राज्यांचा निकाल ०३ डिसेंबर रोजी

Assembly Elections 2023 : निवडणूक आयोगाच्या 'या' योजनेमुळे वाढली नवमतदारांची संख्या
Supriya Sule : "...तर करारा जवाब दिला असता"; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर सुप्रिया सुळेंचे भुजबळांना प्रत्युत्तर
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com