Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात संशयितांचा आकडा सरासरी एक हजारावर

नाशकात संशयितांचा आकडा सरासरी एक हजारावर

नाशिक । Nashik

नाशिक शहरात गेल्या एक आक्टोंबरपासुन नवीन करोना रुग्णांत घट झाल्याने दिलासादायक चित्र असतांनाच आता केवळ संशयितांचा आकडा वाढत चालला आहे.

- Advertisement -

गेल्या सहा दिवसात शहरात 6 हजार 289 इतक्या संशयितांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. परिणामी संशयितांचा आकडा देखील महापालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरु लागला आहे.

नाशिक शहरात गेल्या एक आक्टोंबर पासुन नवीन करोना रुग्णांचा आकडा हा 300 ते 500 च्या दरम्यान आला असतांना आता हा आकडा 280 ते 380 पर्यत येऊन ठेपल्याने आता करोना रुग्णांवरील उपचाराचा ताण काहीअंशी कमी झाला आहे.

यात जवळपास 50 टक्के नवीन करोना रुग्णांकडुन घरात राहुन उपचार घेतले जात असल्याने त्यांची घरी जाऊन नियमित तपासणी पथकांकडुन केली जात आहे. तसेच प्रतिदिन मृताचे प्रमाण देखील 5 ते 7 या दरम्यान आल्याने मृत्यु दर कमी झाला आहे. अशाप्रकारे आता नाशिककरांसाठी दिलासादायक चित्र आता दिसत आहे.

असे असले तरी गेल्या काही दिवसात करोना सदृश लक्षणे दिसत असल्याच्या कारणावरुन संशयित रुग्णांचा आकडा वाढत चालला असुन आता गेल्या सहा दिवसात प्रतिदिन सरासरी एक हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे.

अशाप्रकारे शहरात आता संशयिताचा आकडा वाढत चालला असल्याने त्यांची करोना चाचणी करावी लागत असुन त्याचा अहवाल येईपर्यत त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

यात अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहे. तर अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येत आहे. या एकुण प्रकारामुळे शहरातील महापालिकेच्या कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटर यांवरील ताण मात्र वाढला आहे.

शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु असल्याने आता नागरिकांचा आरोग्य सर्व्हे केला जात असुन यात अँटीजेन व आरटीपीसीआर च्या माध्यमातून नवीन रुग्ण समोर येत आहे. असे असतांना मात्र संशयितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाचे काम आणखी वाढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या