मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात CBI ने नोंदवला गुन्हा; काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात CBI ने नोंदवला गुन्हा; काय आहे प्रकरण?

दिल्ली | Delhi

सीबीआयनं मुंबई पोलीसचे माजी आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे NSE घोटाळा?

आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. ही सॅाफ्टवेअरशी संबंधित कंपनी २००१ मध्ये पांडे यांनी ते सेवेत नसताना स्थापन केली. सेवेत रुजू झाल्यावर पांडे यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा २००६मध्ये राजीनामा दिला. या कंपनीत पांडे यांचे कुटुंबीय संचालक आहेत. झावबा कॉर्पवर उपलब्ध माहितीवरून संतोष पांडे हे २००३ पासून या कंपनीचे पूर्णवेळ संचालक आहेत.

या कंपनीवर एनएसईने २०१० ते २०१५ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सॉफ्टवेअरसंबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती. सर्व्हरमध्ये फेरफार होऊनही त्याबाबतची कल्पना लेखापरीक्षण कंपनीला कशी मिळाली नाही? की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यासंदर्भातच संजय पांडेंची सध्या चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com