
नवी दिल्ली | New Delhi
व्हॉट्सअॅप ( WhatsApp) हे आपल्या वापरकर्त्यांसाठी दर दोन महिन्याला किंवा वर्षभरात नवनवीन फिचर आणत आहे. त्यामुळे वापरकर्ते व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचरचा पुरेपूर फायदा घेतांना दिसत आहेत...
नुकतेच काही दिवसांपूर्वी WhatsApp ने वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप चॅनल्स हे नवीन फिचर आणले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंगचे (WhatsApp Group Calling) नवीन फिचर आणले होते. यानंतर आता व्हॉट्सअॅप लवकरच २४ तास दिसणारे व्हॉट्सअॅप स्टेट्स वापरकर्त्यांना दोन आठवड्यांपर्यंत ठेवता येईल असे एक नवीन फिचर आणत आहे.
याबाबत WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉईड बीटा (Android Beta of WhatsApp) २.२३.२०.१२ या व्हर्जनमध्ये हे अपडेट देण्यात आले असून अॅड स्टेटस (Ad Status)हा पर्याय निवडल्यानंतर पुढे आणखी ऑप्शन दिसणार आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना हे स्टेटस २४ तास, ३ दिवस, १ आठवडा आणि २ आठवडे ठेवण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.
दरम्यान, या फिचरची (Feature) सध्या चाचणी सुरू असून काही दिवसांमध्ये कदाचित सर्व वापरकर्त्यांना (Users) हे फिचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच याबाबत व्हॉट्सअॅप कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. तर काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने चॅनल्स फीचर लाँच केल्यानंतर मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याने व्हॉट्सअॅपमध्ये एआय स्टिकर्स आणि चॅटबॉट देण्याची देखील घोषणा केली आहे.