Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता नाशिक शहरावर असणार तिसऱ्या डोळ्यांची नजर

आता नाशिक शहरावर असणार तिसऱ्या डोळ्यांची नजर

देवळाली कॅम्प । वर्ताहर | Devlali Camp

शहरातील गुन्हेगारीवर (criminality) आळा बसावा व या कामी अवघे शहर सी.सी.टी.व्ही.च्या (CCTV) कक्षेत असावेत यासाठी खा. हेमंत गोडसेच्या (MP Hemant Godse) प्रयत्नांना यश आले असून

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी नगरविकास विभागाच्या (Department of Urban Development) मूलभूत सुविधांचा विकास योजनेतून १५ कोटी रुपयांचा निधी (fund) मंजूर केला असल्याने, शहरात शेकडो सी.सी.टी.व्ही.सह काही ठिकाणी इतर विकास कामे (development works) करण्यात येणार आहेत.

शहरात चोऱ्या (Thieves), घरफोड्या (Burglary), चैन स्नॅचिग (Chain snatching), टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड, मद्यपींकडून सतत होणारी गुंडागर्दी, शहरात वेगाने वाहन चालविणाऱ्या मद्यपींकडून सतत होणारे अपघात आदी गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. पोलीस प्रशासन (Police Administration) जरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणाने पार पडत असले तरी शहराची वाढत्या व्याप्तीमुळे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे.

शहरात सी.सी.टी.व्ही.ची (CCTV) संख्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने चोरटे आणि गुन्हेगारांचे चांगलेच फावते. सक्षम पुरावा हाती येत नसल्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत (Criminals) पोहोचणे अवघड होत असते. यातूनच शहरभर सी.सी.टी.व्ही असावेत अशी मागणी सातत्याने शहरातील विविध संस्थांकडून आणि शहवासियांकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत होती.

शहरवासीयांकडून सुरक्षेविषयी आलेल्या मागणीची गंभीर दखल घेत खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी शहरभर सी.सी.टि.व्ही बसविण्याकामी निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. चार दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीतही खासदार गोडसे यांनी सी.सी.टी.व्ही बसविण्यासाठी निधी (fund) उपलब्ध करून देण्याचा विषय मुख्यमंत्र्यांकडे काढला होता.

शहरातील गुन्हेगारीवर निश्चितच आळा बसू शकेल तसेच खा गोडसे यांची शहराच्या सुरक्षा विषयी असलेली तळमळ पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत शहरात सी.सी.टी.व्ही यांचा बसविण्यासाठी पंधरा कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकात सी.सी.टी.व्ही बसविण्यात येणार असून काही विकासकामेही करण्यात येणार आहे.

या सी.सी.टी.व्ही. मुळे पोलीस प्रशासनाचाही कामाचा भार काही अंशी कमी होणारा असून शहराची सुरक्षा मजबूत होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. सी.सी.टी.व्ही.मुळे आता अवघ्या शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. सी.सी.टि.व्ही बरोबरच जेल रोड जुने सायड्रिक इंडिया कंपनी ते पंचक चौक दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २४ मधील शिवालय कॉलनी येथील महानगरपालिका ओपन स्पेस चे सुशोभिकरण करणे व रस्ता बांधणे,

प्रभाग क्रमांक २७ मधील श्रीकृष्ण नगर येथील ओपन स्पेस येथे सांस्कृतिक भवन बांधणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील अंबड गावातील मारुती मंदिर सर्व सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक दोन मधील नांदूर गावाजवळील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक दोन मधील मानूर गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, प्रभाग क्रमांक २७ मधील राजे संभाजी स्टेडियमचे विद्युतीकरण व सुशोभिकरण करणे, प्रभाग क्रमांक २७ मधील मीनाताई ठाकरे उद्यान अश्विन नगर येथे महिलांसाठी अभ्यासिका बांधणे,

सिंहस्थ नगर परिसराचे सुशोभिकरण करणे, प्रभाग क्रमांक ३१ मधील चेतना नगर महापालिका ओपन स्पेस येथे सामाजिक सभागृह बांधणे व सुशोभिकरण करणे या विकास कामांसाठी प्रत्येकी पन्नास लाखांच्या निधीला तर प्रभाग क्रमांक तीन मधील महानगरपालिका ओपन स्पेसवर अभ्यासिका बांधणे, प्रभाग क्रमांक एक मधील सुशोभिकरण करणे या प्रत्येक कामांसाठी तीस लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या