आता बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकाने अत्यावश्यक प्रवर्गात

शासनाच्या नवीन आदेशानुसार ही दुकाने सुरु करता येणार
आता बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकाने अत्यावश्यक प्रवर्गात
breaking news

मुंबई

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी दुकाने व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे.

आता बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकाने अत्यावश्यक प्रवर्गात
राज्यात म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण : 131 रुग्णालयात मोफत उपचार मिळणार

कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने 13 एप्रिल 2021 रोजीच्या 'ब्रेक द चेन' आदेश काढले होते. त्याचा विस्तार करण्यात आला आहे. आगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.

या दुकानदारांना संबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु 10,000 दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड 19 महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com