परतीचा पाऊस रेंगाळणार ?

परतीचा पाऊस रेंगाळणार ?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाने Rain काही दिवस विश्रांती घेतली असतानाच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा Warning of Heavy Rain हवामान विभागाने Meteorological Department दिला आहे. कालपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून कालपासून सुरुवात झाली. मात्र, आता परतीचा पाऊस चार ते पाच दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

बंगालच्या उपसागरात 10 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याच्या पुढच्या 4 ते 5 दिवसात आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे परतीचा पाऊसही रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

.यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन काही काळ उशिराने झालं असलं तरी राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मोठे नुकसानही झालें. यंदाच्या पावसामुळे राज्यात पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध आहे. आता या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.