आता एका वर्षात मिळणार ‘इतके’ सिलेंडर

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

देशातील वाढत्या महागाईने (inflation) आधीच सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas) रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे…

या प्रक्रियेनुसार ग्राहकांना आता एका वर्षात केवळ १५ सिलेंडर मिळणार आहे. या सिलेंडरचा (Gas Cylinder) कोटा संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त सिलेंडर मिळणार नाही. तसेच एलपीजी सिलेंडरचा प्रत्येक महिन्यांचा कोटा देखील निश्चित करण्यात आला आहे.

यानुसार एलपीजी ग्राहकांना आता एका महिन्यात एकच सिलेंडर घेता येणार आहे. म्हणजेच एक सिलेंडर घेतल्यानंतर त्याच महिन्यात दुसरे सिलेंडर मिळणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारकांना पाहिजे तितके सिलिंडर घेता येत होते. तसेच सिलेंडरबाबत रेशनिंगसाठी असणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला असून या बदलांची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

याशिवाय अनुदानित घरगुती गॅसचे (Subsidized Domestic Gas) रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा महाग असल्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफीलचा वापर कऱण्यात आल्याने त्याच्या तक्रारी समोर येत असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, हा नवीन नियम तिनही तेल कंपन्यांकडून (Oil Companies) लागू करण्यात आला असून त्यानुसार आता अनुदानित सिलेंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात फक्त १२ गॅस सिलेंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची आवश्यकता असल्यास ग्राहकांना विनाअनुदानित सिलेंडर घ्यावे लागणार आहे. तसेच रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *