Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यागुन्हे रोखण्यासाठी आता 'या' भागात 'क्यूआर कोड' प्रणाली

गुन्हे रोखण्यासाठी आता ‘या’ भागात ‘क्यूआर कोड’ प्रणाली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर काँग्रेस व्हिजेएनटी विभागाच्यावतीने (City Congress VJNT Dept) हिरावाडी परिसरातील घरफोडी (burglary) व चोरीचे गुन्हे (Offenses of theft) रोखण्यासाठी

- Advertisement -

शिवकृपा नगर येथे क्यू आर कोड (QR code) लावण्याचा लोकर्पण सोहळा पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे (Panchavati Police Station Senior Police Inspector Dr. Sitaram Kolhe) व परिसरातील महिला यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवकृपा नगरमध्ये गॅस सिलिंडर चोरी व टु व्हिलर चोरी (bike theft) अशा चोरीच्या घटना हिरावाडी परिसरात घडल्या. नाशिक शहर काँग्रेस व्हिजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष शरद बोडके यांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन परिसरातील नागरिकांसह घडलेल्या चोरींची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.कोल्हे यांनी दिली. परिसरातील घरफोडी (burglary) व चोरीचे (theft) प्रकार रोखण्यासाठी परिसरात क्यू.आर.कोड (QR code) लावण्याची मागणी बोडके यांनी यावेळी केली.

कोल्हे यांनी तत्काळ त्यांचे सहकारी साह्यक पोलीस निरीक्षक रोहीत केदार, पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, पोलीस हवालदार संतोष घुगे व कुमावत यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.मारूती मंदिर येथे क्यू.आर.कोड लावण्याचा लोकर्पण सोहळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व परिसरातील महिला यांच्या हस्ते संपन्न झाला. कोल्हे यांनी नागरिकांनी घराबाहेर पडताना काय काळजी घ्यायला हवी याची माहिती दिली.

सोनाली शरद बोडके यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील कलाबाई देशमुख, जीजाबाई वाबळे, कमल गीते, छाया सोनवणे, शीला कदम, कल्पना कापडणीस, प्रतिभा सोनवणे, राधा बिडवे, सुनंदा पाटील, शोभा चासकर, वैशाली लासुरे, स्वाती सोनवणे, गौरी सुर्यवंशी, ॲड शीतल पाटील, संतोष बाबा पाटील, जनतेश यादव आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या