Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता घंटागाडीचा भोंगाही चर्चेत

आता घंटागाडीचा भोंगाही चर्चेत

मनमाड । बब्बू शेख | Manmad

मनसेनाप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मस्जिदींवरील (Mosques) भोंग्याच्या (loudspeaker) बाबतीत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात भोंग्यांच्या आवाजावरून वाद-प्रतिवाद सुरू असतानाच मनमाडला (manmad) नगरपरिषदेच्या (nagar parishad) घंटागाडीवरील भोंगाही आता चर्चेत आला आहे.

- Advertisement -

स्वच्छतेबाबत जनजागृती (Hygiene awareness) करण्यासाठी गाणे वाजवत घंटागाडी शहरात सकाळपासून फिरत असते, कचरा गोळा करते. भोंग्यावर कर्कश आवाजात गाणे वाजविले जातात. त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे मत व्यक्त करत घंटागाडीवरून भोंगा काढून त्याऐवजी सायरन बसविण्यात यावा, अशी मागणी पुढे आली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, भोंग्याच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण (Noise pollution) होत असल्याने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मनसेनाप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत मंदिर-मस्जिदींसोबत सर्वच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्याची मागणी केली.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. धार्मिक स्थळांसोबतच इतर ठिकाणी असलेल्या भोंग्यांकडेही आता जनतेचे लक्ष गेले आहे. असाच एक नगर परिषदेच्या घंटागाडीवरील भोंगा चर्चेत आला आहे. सदर घंटागाडी दररोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी शहरात फिरते. या घंटागाडीवर छोटा भोंगा लावलेला असून त्यातून घनकचरा (Solid waste), साफसफाई, स्वच्छता याबाबत जनजागृती करणारी गाणी वाजविली जातात.

ही घंटागाडी कचरा गोळा करतांना काही ठिकाणी 15 मिनटे, काही ठिकाणी अर्धातास तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त वेळ थांबते. हॉस्पिटल असो वा शाळा; या घंटागाडीवर मोठ्या आणि कर्कश आवाजात गाणे सुरू असते. त्याचा त्रास सर्वांना होतो. त्याबद्दल आतापर्यंत कोणी काहीही बोलत नव्हते. मात्र आता भोंग्यांचा मुद्दा गाजत असल्यामुळे पालिकेच्या घंटागाडीवरील भोंगा देखील चर्चेत आला आहे. हा कर्कश भोंगा काढून त्याजागी सायरन बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या