Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआता फळेच बनली स्वास्थ्यासाठी घातक

आता फळेच बनली स्वास्थ्यासाठी घातक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

खाद्यपदार्थ आणि त्याची गुणवत्ता याबाबत सर्व सामान्यतः जागरूकता आलेली आहे वैद्यकीय उपचार (Medical treatment) घेणारे तसेच स्वास्थ्याबाबत जागरूक असणार्‍या नागरिकांना फळे (Fruits) खाण्याचा आग्रह धरला जातो.

- Advertisement -

मात्र त्या फळांची गुणवत्ता व दर्जा कसा ओळखावा याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) याविरोधात धडक मोहिम सुरु केली आहे. फळे (Fruits) खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. अनेक घरांमध्ये अक्षय तृतीयेपासून आंबेरसाच्या (mango) मेजवानीला सुरुवात होते. आंब्याच्या मागणीला या काळापासून खर्‍या अर्थाने सुरुवात होते. मात्र याचाच फायदा घेत आंबे सुद्धा घातक रसायनांच्या (hazardous chemicals) मदतीने पिकवले जातात.

त्यामुळे आंब्याची गुणवत्ता व दर्जा याबद्दल साशंंकता व्यक्त केली जात आहे. नैसर्गिक (natural) रित्या पिकवलेले आंबे त्यांचा गोडवा, त्यांची चव काही वेगळीच असते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कच्चे फळ आणून रसायनांद्वारे कृत्रिम रित्या आंबे (mango) पिकवण्याचा नवा फंडा व्यवसायिकांनी तयार करुन बख्खळ पैसा कमवण्याची शक्कल सूरू केली आहे. मात्र हा प्रकार नागरीकांच्या आरोग्यासाठी हे घातक असल्याचे समोर आले आहे.

फळे पिकणे या नैसर्गिक प्रक्रियेला फाटा देत काही फळ विक्रेते परराज्यातून फळे खरेदी करतात. तर बहुधा झाडांवरून कच्चीच उतरवलेली असतात. कॅल्शियम कार्बाईड (Calcium carbide) या घातक रासायनाच्या पूड्यांचा वापर करून कृत्रिमरीत्या कच्ची हिरवी फळे पिवळीधमक पिकल्यासारखी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुळत: कच्या फळात रसायन येत असल्याने त्यांचे दु:ष्परीणाम मोठ्या प्रमाणात दिसन येतात.

या प्रक्रिया प्रामुख्याने आंबे (mango) व पपई (Papaya) या फळांवर केल्या जातात. कॅल्शियम कार्बाईड या घातक रासायनाच्या माध्यमातून अ‍ॅसेटीलीन गॅस (Acetylene gas) तयार होतो. हिरवे असलेले फळ त्यामुळे पिवळे दिसू लागते. या रासायनिक प्रक्रियेमुळे पिकविलेली फळे आरोग्यास धोकादायक (Dangerous to health) ठरत आहेत. अश्या पध्दतीचा घातक रसायनांचा वापर करणार्‍या लोकांच्या शोधासाठी अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून शहर व ग्रामिण भागासाठी 2-2 टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. तपासणीत दोषी आढळणार्‍यांवर 10 लाख रुपयांपर्यंत दंडासह न्यायालयाद्वारे शिक्षेची तरतूद कारवाई केली जाणार आहे.

दुष्परीणाम

रसायनाच्या वापरातून कृत्रीम पिकलेली फळे खाण्यातून चक्कर येणे, वारंवार तहान लागते. चिडचिड होते. अशक्तपणा येतो. अन्न नलिका परिणामित होते. त्यामुळे काहीही गिळण्यास त्रास होते, उलट्या व त्वचेवर व्रण येणे आदी प्रश्न निर्माण होतात.

प्रशासनाचे आवाहन फळे किरकोळ व घाऊन विक्रेत्यांनी फळ पिकविण्यासाठी प्रतिबंधित द्रव्याचा वापर करू नये. असे करताना आढळणार्‍यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा 2011 व नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. चुकीच्या पद्धतीने फळे पिकविणारे व्यापारी निदर्शनास आल्यास ग्राहकांनी अन्न औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.

– विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

- Advertisment -

ताज्या बातम्या