Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआता नाशिकहुन थेट 'हज' साठी विमान सेवा

आता नाशिकहुन थेट ‘हज’ साठी विमान सेवा

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून पवित्र हज यात्रेसाठी Hajj Yatra जाणाऱ्या भाविकांना मुंबई ऐवजी ओझर Ozar Airport येथून विमानसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ओझर विमानतळाचा हज टर्मिनलच्या Hajj Terminal यादीत समावेश करावा, या मागणीसाठी खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse यांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे चालविलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहेत.

- Advertisement -

यामुळे ओझर विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत लवकरच समावेश होणार आहे. यामुळे आता हज यात्रेला थेट ओझर विमानतळावरून भाविकांना जाण्याची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. खासदार गोडसे यांनी हा विषय लावून धरला होता व त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा विषय मार्गी लागला आहे.

याबाबतची शिफारस राज्य शासनाकडून केंद्राकडे जाणे आवश्यक असल्याने दोन महिन्यांपूर्वीच खा. गोडसे यांच्या प्रयत्नातून तशी शिफारस राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून केंद्राकडे पाठविण्यात आली होती. तसेच ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी ओझर विमानतळ सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असल्याचा अहवाल देखील स्थानिक प्रशासनाने केंद्राच्या नागरी उडाण मंत्रालयाला पाठविला. यामुळे आता लवकरच येथून हजसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओझर येथून सुरू होणाऱ्या विमान सेवेचा फायदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांना होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

उत्तर महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजार मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जात असतात. यासाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी भाविकांना मुंबई येथे तीन ते चार वेळा जावे लागते. व सर्व पुतर्ता झाल्यानंतर भाविकांना मुंबई विमानतळावरुन हज यात्रेसाठी रवाना व्हावे लागते. यात पैसे आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने भाविकांची मोठी कुचंबना होत असल्याने या टर्मिनलची शिफारस राज्याने केंद्राला करावी म्हणून खा. गोडसे यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विभाग मंत्री नवाब मलिक आणि विभागाच्या सेक्रेटरी जयश्री मुखर्जी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता.

यानंतर केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुक्तार अब्बास नकवी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. हज यात्रेकरूंसाठी खा. गोडसे यांची असलेली तळमळ केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाला भावल्याने त्यांनी ओझर विमानतळाचा हज टर्मिनलच्या यादीत समावेश करण्यासाठी नागरी उडान मंत्रालय आणि एचएएल प्रशासनाला विशेष सूचना दिल्या होत्या. विमानसेवा सुरू करण्यासाठी आजमितीस सर्व आवश्यक असलेल्या परवानग्या मिळालेले असून या प्रस्तावास केंद्राने नुकताच हिरवा कंदील दिला आहे.

तसेच ओझर विमानतळावरून हज उड्डाण सुरु करण्यासाठी हे विमानतळ सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असल्याचा अहवाल एचएएएल प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. यामुळे आता लवकरच ओझर येथून हजसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती खा. गोडसे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजीम सय्यद, ज्येष्ठ कार्यकर्ते हाजी युनूस तांबोळी, मुन्ना शेख, काशिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान ओझर विमानतळावरून हजसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याने जिल्हयातील मुस्लीम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या