
मुंबई । Mumbai
शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (shivsena) मोठ्या बंडानंतर आता राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच भाजपने (bjp) सत्तास्थापनेसाठी वेगळी रणनिती आखण्यास सुरुवात केल्याने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मीडियासाठी 'नॉट रिचेबल' असणार आहेत. त्यामुळे फडणवीस महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे...
भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदासह (Deputy Chief Minister) १२ मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली असून सहा मंत्रिपद असलेल्या शिंदे गटाल (Shinde group) एकूण मंत्रिमंडळाच्या २५ टक्के हिस्सा देण्याची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच सत्तेचा हा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी फडणवीसांचा सागर बंगला (Sagar Bungalow) गोपनीय हालचालींचे केंद्र बिंदु ठरला आहे.
दरम्यान, सध्या शिंदे गटाकडे ४५ हून अधिक आमदारांचे (mla) समर्थन आहे. तसेच आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचे पत्र राज्यपालांना (Governor) देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.