Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकेंद्राचा मोठा निर्णय : कोरोना मुक्तीनंतर तीन महिन्यांनी घेता येणार लस

केंद्राचा मोठा निर्णय : कोरोना मुक्तीनंतर तीन महिन्यांनी घेता येणार लस

नवी दिल्ली

कोरोनावर मात करुन घरी परतलेल्या व्यक्तीने आता कोरोनाची लस कधी घ्यावी? याचे उत्तर अखेरी केंद्र शासनाने निश्चित केले. यासंदर्भात नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन (The National Technical Advisory Group on Immunisation)(NTAGI)ची शिफारस केंद्राने अमान्य केली. आता कोरोनामुक्तीनंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी, असा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनने कोरोना मुक्तीच्या नऊ महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारस केली होती.

- Advertisement -

NEGVAC ने केलेल्या सूचनानंतर एखादा व्यक्तीला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर त्याने कोरोनामुक्त झाल्यानंतर ३ महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोनाची लस दिली जावी

लसीकरणाबाबत या नवीन सूचना

1. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला 3 महिन्यानंतर कोरोना लस दिली जाऊ शकते

2. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर कोरोनातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांना दुसरा डोस घ्यावा.

3. आपल्या बाळांना स्तनपान करणाऱ्या माताही कोरोना लस घेऊ शकतात.

4. कोरोना लस घेण्यापूर्वी रॅपिड एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नाही.

NTAGI च्या सूचना केंद्राकडून अमान्य

कोरोना मुक्त झाल्यानंतर लस घेण्याचा कालावधी सध्या सहा महिने आहे. त्यात बदल करुन नऊ महिने करण्याची शिफारस नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन (The National Technical Advisory Group on Immunisation)(NTAGI)या शासनाच्या समितीने ही केली होती .देशातील कोरोना रुग्णांचा आकडा काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आता लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. यामुळे कोरोना लसीकरणाच्या धोरणातही बदल होत आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय नुकताच नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशनकडून घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या