आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सर्वसामान्यांना वेळेचं बंधन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची माणसांच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री (Chief Minister) अशीच ओळख आहे. प्रश्न घेऊन आलेल्या व्यक्तीला भेटल्याशिवाय मुख्यमंत्री पुढे जात नव्हते. मात्र, आता सर्वसामान्यांच्या भेटीला आता वेळेचे बंधन राहणार आहे....

प्रत्यक्षरित्या निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांना आपली निवेदन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयीन कामाच्या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत देता येणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना अनुसरून असलेली पत्र मुख्यमंत्री सचिवालय, टपाल कक्ष, मुख्य इमारत तळ मजला येथे जमा करून त्याची पोच दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा पाठपुरावा संदर्भात माहिती मिळावी यासाठी मुख्यमंत्री सचिवालय, टपाल कक्ष, मुख्य इमारत तळ मजला येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

मंत्रालयात गर्दी वाढत आहे. त्यामुळे सीएम यांना द्यायचे निवेदन तळ मजला येथे पुन्हा स्वीकारले जाणार आहे. या आधी ही तळ मजला येथे निवेदन स्विकारले जात होते. प्रत्यक्षरित्या निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांना त्यांची निवेदन कार्यालयीन कामाच्या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत स्विकारली जाणार आहेत. त्यामुळे मात्र, आता सर्व सामान्यांच्या या भेटीला वेळेचे बंधन राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिंदे सरकारचा मविआला पुन्हा दणका; 'त्या' प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com