Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता रेल्वे तिकिटासाठी आधार, पॅनकार्ड सक्तीचे

आता रेल्वे तिकिटासाठी आधार, पॅनकार्ड सक्तीचे

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

रेल्वेने (Railways) यापुढे आधार कार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (PAN Card) व पासपोर्ट (Passport) शिवाय रेल्वे तिकीट बुकिंग (Ticket booking) करण्यास मनाई केल्याने तिकिटाचा होणारा काळाबाजार (Black market) यापुढे थांबणार असल्याचे रेल्वेचे झेडयुआरसीसीचे माजी सदस्य रतन चावला (Ratan Chawla) यांनी सांगितले….

- Advertisement -

त्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे…

रेल्वे तिकीट बुकिंग १२० दिवस अगोदर केली जात असल्याने ते करताना अनेक काळाबाजार करणारे लोक बनावट आयडी (Fake ID) तयार करून रेल्वेच्या वातानुकूलित व इतर गाड्यांच्या तिकिटाचे आरक्षण करीत असत.

हीच तिकीटे गरजवंताना काळाबाजारात सर्रास विक्री करीत असे. ही बाब रेल्वे समितीचे सदस्य असलेल्या चावल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 2017 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu), राज्य मंत्री मनोज सिन्हा (Manoj Sinha), राजेन गोहेन (Rajen Gohen) याशिवाय नवी दिल्ली, गोरखपुर, गुहाटी, कोलकत्ता, सिकंदराबाद, चेन्नई, मुंबई, हुबळी, जयपुर, जबलपूर, औरंगाबाद, बिलासपुर, भुवनेश्वर, हाजिपूर, नवी मुंबई या सर्व विभागाच्या जनरल मॅनेजर यांना तिकिटांचा होणाऱ्या काळाबाजार बाबादची माहिती दिली होती.

त्यानुसार रेल्वेने गेल्या तीन वर्षात या सर्व प्रकाराची पडताळणी आपल्या एजन्सीच्या माध्यमातून केली असता चावला यांनी केलेली तक्रार सत्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नुकतेच रेल्वे मंत्रालयाने यापुढे तिकीट आरक्षित करताना आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट यांचे सक्तीकरण केले आहे.

यामुळे हाताचे बोटाचे ठसे, डोळे आदींची नोंद मिळू शकते. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्याचा गोरखधंदा देशभरातील विविध स्टेशन लगत असलेल्या काही लोकांकडून सर्रासपणे सुरू होता. त्यामुळे यात्रा करणाऱ्या भाविकाला तसेच नागरिकांना तिकिटे उपलब्ध होत नसे.

Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

त्याचवेळी काळाबाजार करणार्‍यांकडे अशाप्रकारची तिकिटे उपलब्ध होत असे. या तिकिटांचा भाव दुप्पट राहत असे. चढ्या भावाने बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची तक्रार चावला यांनी रेल्वे कमिटी सदस्य असल्याच्या माध्यमातून करताना त्यांनी सहा राज्यांतील मोठमोठ्या रेल्वे स्टेशनच्या शहरांमध्ये जाऊन पाहणी करूनच तक्रार केली होती.

त्यांनी रेल्वे मंत्रालयाला पत्राद्वारे अशा प्रकारच्या काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तीन वर्षांनी का होईना ही मागणी मान्य झाली आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या गरजवंतांना यामुळे फायदा होणार आहे.

आपण जेव्हा रेल्वेच्या झोनल कमिटीचे सदस्य होतो. त्यावेळी विविध शहरात जाऊन माहिती संकलित केली असता रेल्वे तिकिटाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले. बोगस आयडी तयार करून काही लोक रेल्वे तिकिटांची सर्रास विक्री करीत असल्याचे आढळून आले. एकाच माणसाच्या नावावर दररोज तिकीट बुकिंग करून हेच तिकीट गरजवंत प्रवाशांना दुप्पट भावाने विकण्याचा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून सुरु होता. रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार या प्रकाराला आता आळा बसून गरजवंतांना तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

-रतन चावला, माजी सदस्य, रेल्वे समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या