मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाची महापालिका आयुक्तांना सूचना

मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाची महापालिका आयुक्तांना सूचना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेसह ( NMC ) राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, वसई - विरार, पुणे, पिंपरी - चिंचवड , सोलापूर,कोल्हापूर,अकोला,अमरावती व नागपूर या 14 मनपा निवडणुकीसाठी मतदार यादीच्या ( Voter lists) कार्यक्रमास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सुचना निवडणूक आयोगाने( State Election Commission )मनपा आयुक्तांना केल्या आहेत.

राज्यातील 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या 23 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 23 जून ते 1 जुलै या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. तर 9 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

याबाबत मतदारांना मोठ्या प्रमाणावर अवगत करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यावरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे आदी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करत नाही.

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आर्दी संदर्भातील दुरुस्त्या करण्यात येतात, याबाबत मतदारांना माहिती होणे आवश्यक आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमास व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com