बाजारसमितीचे आर्थिक नुकसान; संचालकांना नोटीसा

बाजारसमितीचे आर्थिक नुकसान; संचालकांना नोटीसा

पंचवटी | वार्ताहर | Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Krushi Utpanna Bazar Samiti) अनियमित कामकाजामुळे बाजार समितीचे नुकसान झाल्याचे उपनिबंधक सहकारी संस्था (Deputy Registrar Cooperative Society) नाशिक तालुका यांच्या चौकशी अहवालात (Inquiry report) प्रथमदर्शी आढळून आले आहे...

बाजार समितीच्या संचालक व सचिव (Market Committee Director and Secretary) यांना कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक तथा विशेष लेखापरीक्षक वर्ग–१ सहकारी पणन संस्थाचे प्राधिकृत चौकशी अधिकारी ए. के. पाटील (A. K. Patil) यांनी नोटीस (Notice) काढली आहे.

त्यात समितीत झालेल्या अनियमिततेस व आर्थिक नुकसानीस आपणास वैयक्तिक व सामुदायिकरित्या का जबाबदार धरु नये? असा सवाल करीत त्यावर खुलासा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह (Documents) हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संचालक मंडळात सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या संचालकांच्या कार्यकाळात अनियमितता व आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशी अहवालात आढळले आहे. त्यात महापालिकेची (Nashik Municipal Corporation) परवानगी न घेता सेलहॉल संकुलाचे बांधकाम केले.

फर्निचरची खरेदी, हॉटेल टपरीचे भाडे कमी केल्याने झालेले नुकसान, रंगकामे व दुरुस्ती, रस्त्याचे काम, प्रवेशद्वार, गेट व केबिनचे बांधकाम, सेलहॉल व शेतकरी निवास दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, संरक्षक भिंत, ड्रेनेज लाईन आदी कामे करण्यात आलेली आहे.

यातील काही कामांना खात्याची परवानगी असली तरी निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. ई- निविदा पध्दत वापरून कामकाज करण्यात आलेले नाही. स्थानिक प्राधिकरणाच्या पूर्व परवानग्या नाहीत. हॉटेल टपरीचे भाडे कमी केल्याने बाजार समितीचे नुकसान झाले आहे.

कामासाठी ठेकेदारास वर्कऑर्डर व करार केलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यापूर्वी तज्ञ व्यक्तींकडून तांत्रिक अहवाल घेतलेला नाही आदी बाबी चौकशीत आढळल्या आहेत.

त्यानुसार बाजार समितीच्या संचालकांसह सचिव यांना सोमवारी दि. २६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात आवश्यक असलेल्या कागदपत्र प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्यांच्या समक्ष सादर करण्याचे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे.

खुलासा सादर केला नाही, सादर केलेला खुलासा समर्पक नसल्यास किंवा मुद्द्यांबाबत काहीही म्हणणे नाही, असे गृहित धरुन उपलब्ध कागदपत्रे, बाजार समितीचे दप्तर व चौकशी अहवालातील अभिप्राय ग्राह्य धरून कारवाई करण्यात येईल, असे नोटीशीत नमूद केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com