मनपातील बंडखोर नगरसेवकांना नोटीसा

विभागीय आयुक्तांकडे सुनावणी
मनपातील बंडखोर नगरसेवकांना नोटीसा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिकेतील (Municipal Corporation) भाजपच्या (BJP) 27 व अन्य (other) 27 बंडखोर नगरसेवकांना (rebel corporators) अपात्र संदर्भात (unqualified context) विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioner) नोटीसा बजावल्या (Notice served) आहे. दि.18 रोजी 11 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांच्याकडे ही सुनावणी (Hearing) होणार आहे.

2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले होते. नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेत गेले होते. याबाबत भाजप गटनेते भगत बालाणी यांनी भाजपमधून बंडखोरी करणार्‍या 27 नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती.

तर, बंडखोर गटातील गटनेते ड. दिलीप पोकळे यांनी देखील प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्या व्हिपचे उल्लघंन केल्यामुळे भाजपच्या 27 नगरसेवकांना अपात्र करण्याची याचिका विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या दोन्ही याचिकांवर दि.18 रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे.

त्यासाठी दोन्ही गटातील नगरसेवकांनी उपस्थित रहाण्यासंदर्भात नोटीस विभागीय आयुक्तांकडून बजाविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरातून या दोन्ही याचिकांवर कामकाज सुरु असून आता कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

त्यामुळे सुनावणी दरम्यान अंतिम निर्णय होईल की काय याबाबत बंडखोर गटातील नगरसेवकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com