धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा

धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीसा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका हद्दीत 1,200 वाडे व घरे मोडकळीस आली(Dilapidated houses )असून ती धोकादायक ( Dangerous )झाली आहेत अशा घरांचा शोध घेवून मनपाने यापैकी 700 घरमालकांना नोटिसा ( Notices To House Owners )बजविण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. पावसाळा सुरू होताच शहरात ठिकठिकाणी जुने वाडे, घरे कोसळू लागतात. काहीवेळा वित्तहानीबरोबर जीवितहानी होते. यावर खबरदारी म्हणून मनपाने शहरातील जी घरे मोडकळीस आलेली आहेत अशी घरे, वाडे मालकांना नोटिसा देण्याचे काम हाती घेतले आहे.

या नोटिसा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 265,265 व 266 अन्वये खाली करुन देणे आवश्यक असतांनाही संबंधित मालक, भोगवटादार खाली करुन देत नसल्याचे निदर्शनास आल्याने अशा इमारतींना तातडीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 266 नुसार नोटिसा बजाविण्यांत आल्या आहेत. ज्या इमारतीत भाडेकरू राहतात, त्या भाडेकरूंना इशारा देण्यात आला आहे.

भाडेकरू अथवा घरमालकांनी अशा इमारतींचा धोकादायक भाग स्ट्रक्चरल कन्सल्टंटची मदत घेऊन उतरवून घेताना कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी. धोकादायक इमारतीमध्ये राहणार्‍या नागरिकांना मनपाकडून घरे खाली करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.

या इमारती त्वरित मोकळ्या कराव्यात. जेणे करुन जीवितहानी टाळता येईल. नागरिकांनी या इमारती मोकळ्या न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 268 नुसार पोलिसांमार्फत या इमारती मोकळ्या करुन घेण्यात येतील अशा इमारतींचा भाग उतरवितांना काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. धोकादायक इमारती, घरे, वाडे त्वरित खाली करुन नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.