कार्यकारी अभियंत्यास नोटीस

कार्यकारी अभियंत्यास नोटीस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग (Construction Department of Zilla Parishad) क्रमांक एकच्या कार्यकारी अभियत्यांस मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात ठेकेदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यातच काम वाटप समितीने केलेल्या कामांमध्ये अनियमिता आढळून आल्याने बनसोड यांनी या कामांना स्थगिती देत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी बनसोड यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती.

कार्यकारी अभियंत्याविरोधात काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. त्याचअनुषगांने त्यांच्या कामकाजाबाबत मंत्रालयात प्रशासनाकडून अहवाल पाठविण्यात आला होता. याच दरम्यान बनसोड यांनी या कार्यकारी अभियंत्यास शुक्रवारी (दि.23) कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य विभागातील कामांचे कार्यारंभ आदेश वेळात वितरीत न करणे, सुशिक्षित बेरोजदार अभियंत्यांच्या काम वाटप प्रक्रियेमध्ये अनियमिता, ठेकदारांची अडवणूक करणे, अकारण वाद घालणे आदी तक्रारी असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com