'या' थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा

महानगरपालिका
महानगरपालिका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) कर विभागाच्या (Tax Department) वतीने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला असून,

या अंतर्गत सातपूर (satpur) विभागातील निमा (NIMA) संघटनेसह पाच उद्योग व दहा नागरिकांकडे थकीत घरपट्टीसाठी (house tax) जप्ती नोटीस (notice) बजावण्यात आली आहे.

नाशिक मनापासून विभागाच्या वतीने करअधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार सातपूर (satpur) विभागातील घरपट्टीबाबत (house tax) मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकतीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची प्रकरण 8 (कराधान नियम) 42 ते 47 अन्वये पंधरा मिळकत धारकांना मालमत्ता (property) जप्त करण्याची नोटीस बजावण्याची तयारी करण्यात आलेली आहे.

या थकबाकीमध्ये प्रामुख्याने उद्योजकांची संघटना निमासह (NIMA) पाच मोठे उद्योग व 10 निवासी प्रकल्पाकडे सुमारे 41 लाखांची थकबाकी आहे. या संदर्भात सातपूर विभागीय अधिकार्‍यांच्या माध्यमातून या थकबाकी दारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येणार आहे. मनपाचे या भूमिकेमुळे विविध करांच्या थकबाकीदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

थकबाकी वसूलीसाठी मनपा आयुक्तांनी सूटीवर जाण्यापूर्वी दिलेल्या अल्टिमेटम मुळे मनपाच्या सहाही विभागातून या प्रकारच्या कारवायांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम वेगाने सूरू करण्यात आलेले आहे.त्यामुळे खर्‍या अर्थाने वसूलीला गती दिल्याने मार्च अखेरपर्यंत शुन्यावर आण्याचा मनोदय अधिकारी वयक्त करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com