पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान: खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांना नोटीस

पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान: खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांना नोटीस

औरंगाबाद

पुत्रप्राप्तीच्या विधानावरुन वादग्रस्त ठरलेले समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराजांविरुद्धची तक्रार रद्द केली होती. त्याविरोधात रंजना गवांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यांनी धाव घेतली आहे. त्यांच्यांमार्फेत जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली. या प्रकरणाची सुनावणी औरंगाबाद खंडपीठाने 29 जून 2021 रोजी ठेवली आहे.

पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान: खंडपीठाकडून इंदोरीकर महाराजांना नोटीस
1 जूनला मान्सूनचे केरळात येणार, राज्यात या तारखेपर्यंत आगमन

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन करत असताना स्त्रीभ्रूणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते त्या अंतर्गत त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी यासंदर्भात प्रोसेस इशू केली होती याविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे आदेश रद्द केले होते. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात खंडपिठाने इंदुरीकर महाराज व अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावे नोटीस काढली आहे.

काय आहे प्रकरण

संगमनेर न्यायालयात जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याबाबत आदेश दिले होते.

इंदोरीकर यांच्यावतीने न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल करण्यात आला होता. तो खालील न्यायालयाने पीसीपीएनडीटी कायद्याचे कलम 1 आणि 22 प्रमाणे प्रोसीस इशू केली होती. त्याविरोधात इंदोरीकर यांच्यावतीने रिव्हीजन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने इंदोरीकर यांचा अर्ज मान्य केला आणि जी प्रोसीस इशू केली होती ती रद्द केली.

न्यायालय काय म्हणाले होते?

इंदोरीकर महाराज जे बोलले त्यात कुठलाही जाहिरातीचा भाग नव्हता. सेक्शन 22/1 आणि 22/2 मध्ये जाहिरात करण्यासाठी तसे बोलावं लागतं. त्यामुळे ते काही जाहिरातीमध्ये बसत नाही. दुसरी बाब अशी की, महाराज जे काही बोलले ते आयुर्वेद कॉलेजला जो अभ्यासक्रम आहे. त्यातील तीन ग्रंथांमध्ये संस्कृतमध्ये जे सांगितलं आहे त्याचेच बोल महाराजांनी बोलले आहे. याच्याव्यतिरिक्त महाराज बोलले नाही. त्यामुळे हा गुन्हा होत नाही. कारण डॉक्टर बालाजी तांबे यांच्या खटल्यात उच्च न्यायालयाने जे आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये दिले आहे ते वक्तव्य करणे हा गुन्हा होत नाही, असे म्हटले होते. किर्तनामध्ये धर्मग्रंथामधील किंवा संहितेमधील एखादे वाक्य सांगणे हा काही गुन्हा नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com