धोकादायक इमारतींंबाबत आयुक्तांकडून सूचना

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

धोकादायक इमारतीधारकांना केवळ नोटीसा (Notice to dangerous building owners )देण्यापुरते औपचारिकता न करता ज्या इमारती पावसाळ्यात( Rainy Season )कोसळून अपघात होऊ शकतात, अशा इमारतीवर पादचार्‍यांच्या खबरदारीसाठी धोकादायक इमारत असल्याचे फलक (Signs of being a dangerous building) लावावेत, अशा सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या.

महापालिका आयुक्तांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, केवळ नोटिसाच नव्हे तर धोकादायक असलेल्या इमारती कोसळून कुठले अपघात होण्यापूर्वी त्या भागातील पादचारी आणि स्थानिकांना माहितीसाठी संबधित इमारतीवर धोकादायक असल्याबाबत दर्शनी भागावर ठळक फलक लावावेत, अशाही सूचना दिल्या.

दर्शनी भागात फलक

शहरात 1,200 वाडे व घरे मोडकळीस आलेली व धोकादायक आहे. त्यांचा शोध घेत, यांपैकी 700 घर मालकांना नोटिसा बजविण्यात येणार आहे. सध्या नोटिसा तयार करण्याचे काम सुरु आहे. नाशिक शहरात पावसाळा सुरू होताच शहरात ठिकठिकाणी जुने वाडे, घरे कोसळू लागतात. विशेष 30 मीटरहून अधिकच्या मोठ्या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. अशा वेळी अचानक घरे वाडे कोसळून जीवित, वित्तहानी होते. त्यामुळे रस्त्याने ये जा करणार्‍यांचे लक्ष वेधले जावे, अशा पध्दतीने फलक लावावेत ही आयुक्तांची सूचना आहे. त्यामुळे जीवितहानी- वित्तहानी टाळता येते. यावर खबरदारी म्हणून मनपाने शहरातील जी घरे मोडकळीस आलेली आहेत अशी घरे,वाडे मालकांना दरवर्षी महापालिकेकडून नोटीसा दिल्या जातात. त्यात औपचारिकता न ठेवता रस्त्यालगत धोकादायक घरांबाबत तेथे फलक लावावेत. रस्त्याने ये-जा करणार्‍यांच्या नजरेत भरतील अशा दर्शनी भागातच नोटिसा लावाव्यात, असे आयुक्तांनी बजावले.

वीज कंपनीत समन्वय नाही

पूर्वपावसाळी कामांत, महापालिका, वीज कंपनीत समन्वय नाही. ज्या भागातून विजेच्या वाहिन्या गेल्या आहेत. त्याच विजेच्या लाईनखाली महापालिकेचे वृक्षारोपण झाले आहे. ती झाड आता वाढली असून वाढलेल्या झाडांच्या फांद्या वीजेच्या उघड्या तारांच्या जाळ्यात घुसतात. त्यानुसार वीज कंपनीचे आधिकारी पाहणी करुन फांद्या तोडतात. पण फांद्या तोडल्या नंतर ते रस्त्यातच तशाच फेकून निघून जातात वीज कंपनी आणि महापालिका यांच्यात समन्वय राहिल्यास वीजेच्या ताराखाली वृक्षांची लागवड होणार नाही. तोडलेल्या फांद्या रस्त्यात तशाच पडून लोकांची गैरसोय होणार नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *