अजित व पार्थ पवार
अजित व पार्थ पवार
मुख्य बातम्या

आता राष्ट्रवादीत ‘मानापमान’ नाट्य; ‘जोर बैठका’ सुरूच !

मात्र ज्येष्ठ नेत्यांचे सूचक ‘मौन’!!

Kishor Apte

Kishor Apte

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांनी नातू पार्थ पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारसाठी नवेच संकट ठरले आहे. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत पेल्यातील वादळ उफाळून आले आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार (parth pawar) यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हणत, पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असेही वक्तव्य केले होते. त्यानंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थाची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर बोलावून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्यामुळे अजित पवारही नाराज असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठकीतूनही ते लवकर निघाले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांची सिल्व्हर ओक इथे बैठक झाली होती. आजोबांनी नातवाला सुनावले त्यात गैर काय? अशी सारवा सारव राष्ट्रवादीचे नेते करत असले, तरी एक पिता म्हणून अजित पवारांना शरद पवारांनी माध्यमांसमोर पार्थला बोललेले शब्द लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आज दिवसभर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com