Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे-फडणवीस सरकारचा 'मविआ'ला पुन्हा धक्का; 'हा' निर्णय रद्द

शिंदे-फडणवीस सरकारचा ‘मविआ’ला पुन्हा धक्का; ‘हा’ निर्णय रद्द

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर महाविकासआघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय रद्द करण्याचा धडाका लावला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द (Non-Government Appointments) करण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

महाविकासआघाडी सरकारने केलेल्या विविध महामंडळ, प्राधिकरण, समित्या, सरकारी उपक्रम आणि मंडळं यावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastav) यांनी सर्व विभागांना दिले आहेत. या आदेशानुसार १६ सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, येत्या आठवड्याभरात महाविकास आघाडी सरकारने (MahaVikas Aghadi Government) केलेल्या सर्व अशासकीय नियुक्त्या रद्द होणार असून महिनाभरात शिंदे-फडणवीस सरकारकडून नव्या अशासकीय नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या