नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई | Mumbai

अमरावतीच्या (Amravati) अपक्ष ((Independent) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे...

गेल्या महिनाभरात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे. राणा ज्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतू राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती.

दरम्यान, शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र (Caste certificate) मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार नवनीत राणा यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट बजावले आहे. तसेच अटक वॉरंट निघताच नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com