नवी दिल्ली

भारतीय रेल्वे आपले नेटवर्क अपग्रेड करत आहे. यामुळे ताशी १३० ते १६० किमी वेगाने रेल्वे धावणार आहेत.

स्वर्णिम चतुर्भुज योजनेप्रमाणे लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यामध्ये स्लीपर कोच पुर्णपणे संपवण्यात येणार आहे. म्हणजेच या गाड्यांमध्ये फक्त एसी कोच असणार आहेत. या गाड्यांचा वेग १३०/१६० किमी प्रति तास असेल. खरंतर मेल व एक्सप्रेस रेल्वे १३० किमी किंवा त्यापेक्षा वेगाने चालवण्यासाठी नॉन-एसी कोचमध्ये तांत्रीक अडचण निर्माण होते. यामुळे या गाड्यांमधून स्लीपर कोच संपवण्यात येणार आहे. या गाड्यांध्ये सध्या ८३ कोच लवण्याचा प्रस्ताव आहे. तो वर्षाअखेर पर्यंत १०० कोचवर जाणार आहे.

पुढील वर्षी २०० कोच

तसेच पुढील वर्षी कोचची संख्या २०० घेऊन जाण्याची योजना आहे. विशेष म्हणजे हे बदल करता तिकिटांचे दर आताच्या एसी-३ पेक्षा कमी ठेवण्याचा विचार आहे. हे बदल करताना नॉन एसी कोच नसतील, असे नाही. परंतु या गाड्यांचा वेग ११० किमी प्रतितास असेल.