व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी एका दिवसात तब्बल 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल

व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी एका दिवसात तब्बल 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येत्या ११ जून रोजी होणाऱ्या नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी (Vyapari Bank Election) इच्छुक उमेदवारांची (Candidates) संख्या प्रचंड प्रमाणात असून आज चौथ्या दिवशी तब्बल १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर गेल्या चार दिवसात एकूण १०४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या मंगळवार (दि.१६) रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे किती अर्ज दाखल होतात याकडे नाशिकरोड परिसरातील नागरिकांचे व बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे....

व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी एका दिवसात तब्बल 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल
'मविआ'त जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला

व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Application) भरण्याच्या प्रक्रियेला दि. १० मे रोजी सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने निवडणुकीचे कामकाज होऊ शकले नाही. परिणामी आज सोमवार (दि.१५ ) रोजी इच्छुक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

तसेच या निवडणुकीत प्रथमच इच्छुकांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे पॅनलच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. पॅनलमध्ये कोणाला घ्यायच व कोणाला नाही यामुळे मोठ्या प्रमाणात गटबाजी निर्माण होण्याची शक्यता आहे. जागा कमी व इच्छुक प्रचंड प्रमाणात अशी अवस्था सध्या बँकेच्या निवडणुकीची झाली आहे.

व्यापारी बँकेच्या निवडणुकीसाठी एका दिवसात तब्बल 'इतके' उमेदवारी अर्ज दाखल
Nashik : पिकअपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान आतापर्यंत एकूण ३०८ अर्जांची विक्री झाली असून एकूण १०४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.तर या निवडणुकीत अनेक आजी-माजी नगरसेवक व विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सतीश खरे हे काम बघत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल

निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, सुनील चोपडा, मनोहर कोरडे, जगन आगळे, अशोक सातभाई डॉ. प्रशांत भुतडा, श्रीराम गायकवाड, वसंत अरिंगळे, रमेश धोंगडे, जगदीश गोडसे, योगेश नागरे, तानाजी भोर, अजित गायकवाड, प्रकाश मस्के, सुधाकर ताजनपुरे, नितीन खोले, प्रकाश पाळदे, सुरेश गायकवाड, अरुण जाधव, हेमंत गायकवाड, अशोक चोरडिया, गणेश खर्जुल, अतुल धोंगडे, शिवाजी भोर, अशोक मस्के, राजेंद्र दुसाने, भैय्या बाहेती, दीपक बलकवडे, श्याम गोहाड, आशिष वामन हगवणे या उमेदवारांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तर महिला राखीव गटातून विद्यमान संचालिका कमल आढाव, रंजना बोराडे तसेच संगीता गायकवाड, मनीषा आडके यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती जमाती या गटातून रामदास सदाफुले, रविकिरण घोलप, शरद उबाळे, अंबादास पगारे, लक्ष्मी ताठे यांचा समावेश आहे.

विमुक्त जाती भटक्या जमाती या गटातून प्रवीण नागरे, संदीप कारवाल, संतोष चाफळकर, गुंडाप्पा देवकर, या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

तसेच इतर मागासवर्ग गटातून सुधाकर जाधव चंद्रकांत विसपुते, गौरव विसपुते, अशोक मस्के, शिवाजी हंडोरे, या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com