विराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत

विराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli- Rohit Sharma) यांच्यात वाद सुरू असल्याचं बोललं जात आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) हे दोघंही एकत्र टीम इंडियातून (Team India) खेळलेले नाहीत, त्यातच बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीकडून वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतली, त्यामुळे तो नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. एवढच नाही तर त्याने दक्षिण आफ्रिकेतल्या (India vs South Africa) वनडे सीरिजमधून माघार घेतली असल्याचंही वृत्त प्रसिद्ध झालं आहे. या सगळ्या संशयाच्या वातावरणात बीसीसीआयसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. आता यासंदर्भाक क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)यांनी मौन सोडले.

विराट-रोहितमधील वादामुळे सरकारही चिंतेत
Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

विराट आणि रोहित यांच्या नात्यात गेल्या ४ वर्षात काही तणाव पाहायला मिळाले आहे. दोघांमधील तणावासंदर्भात अनुराग ठाकूर यांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, खेळापेक्षा मोठे कोणी नाही. खेळच सर्वोच्च आहे. कोणत्या खेळाडूंत काय सुरु आहे, यासंदर्भातील माहिती मी देऊ शकणार नाही. याबाबत त्या खेळाशी संबंधित संस्थेनेच माहिती द्यावी.

कर्णधारपद कारण?

विराटला वनडे संघाचे कर्णधारपद सोडायचे नव्हते. विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नये असे बीसीसीआयने सांगितले होते. तरी देखील त्याने तो निर्णय घेतला. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर ३ महिन्यांनी बीसीसीआयने वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे दिले. या संदर्भात स्वत: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले होते. भारतीय क्रिकेट संघातील या दोन सुपर स्टारमध्ये ड्रेसिंग रुमचे वातावरण शांत ठेवण्याची मोठी जबाबदारी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com