हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी नोबेल

सौकुरो मानेबे, क्लाऊस हॅसलमन, जॉर्जियो पॅरिसी यांना भौतिकशास्त्रातील पुरस्कार
हवामान आणि भौतिक प्रणालींमधील शोधांसाठी नोबेल
USER

स्वीडन । वृत्तसंस्था Sweden

सन 2021 साठीच्या भौतिकशास्त्रातील नोबेलची घोषणा Nobel Prize in Physicsझाली आहे. जपान , जर्मनी आणि इटली Japan ,Germany and Italy येथील तीन शास्त्रज्ञांची भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली आहे. यंदाचा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. सौकुरो मानाबे Syukuro Manabe आणि क्लाऊस हॅसलमन Klaus Hasselmann या दोघांना मिळून अर्धा पुरस्कार तर जॉर्जियो पॅरिसी Giorgio Parisi यांना अर्धा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सौकुरो मनाबे (90) आणि क्लाऊस हॅसलमन (89) यांची पृथ्वीच्या हवामानाचे फिजिकल मॉडेलिंग, वैश्विक तापमानवाढीच्या अंदाजांची अचूकता या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी निवड करण्यात आली आहे. जॉर्जियो पॅरिसी (73) यांची पुरस्काराच्या दुसर्‍या भागासाठी निवड झाली आहे. त्यांची निवड ‘अणूपासून ग्रहांच्या मापदंडांपर्यंत भौतिक प्रणालींमधील विकार आणि चढउतार यांच्या परस्परसंवादाच्या शोधासाठी’ करण्यात आली आहे.

निर्णायक मंडळाने स्पष्ट केले की, मानबे आणि हॅसलमन यांनी पृथ्वीच्या हवामानाबद्दल आणि त्यावरील मानवांच्या प्रभावाबद्दल आमच्या ज्ञानाचा पाया रचला. वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने जागतिक तापमान कसे वाढेल हे मानबे यांनी 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला दाखवले होते आणि अशा प्रकारे विद्यमान हवामान मॉडेलची पायाभरणी केली.

सुमारे एक दशकानंतर हॅसलमनने एक मॉडेल तयार केले. जे हवामान आणि जलवायू एकत्र करते. याने हवामानाचे झपाट्याने बदलणार्‍या स्वरुपानंतरही जलवायूसंबंधी मॉडेल कसे वैध असू शकतात हे समजण्यास मदत झाली. हवामानावर माणसाच्या प्रभावाची विशिष्ट चिन्हे शोधण्याचे मार्गही त्याने शोधून काढले.

पॅरिसीने एक संपूर्ण भौतिक आणि गणिती मॉडेल तयार केले. ज्यामुळे जटिल प्रणालींना समजणे सोपे झाले.

Related Stories

No stories found.