नाशकात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

नाशकात 'या' दिवशी पाणीपुरवठा बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनपाचे मुकणे धरण ( Mukane Dam ) रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथून एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. या सब स्टेशनमधील दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार दि.20 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत पॉवर सप्लाय बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच मनपाच्या गंगापूर धरण पंपिंग स्टेशन ( Gangapur Dam Pumping Station )येथील दुरुस्ती काम देखील आवश्यक असल्याने शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र येथून संपुर्ण नाशिक शहराला पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही.

यामुळे या दोन्हीही ठिकाणांहून होणारा पूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद ठेऊन काम होणार असल्याने संपूर्ण शहराला होणारा शनिवारी सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com