न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी घेतला हा निर्णय
निवडणूक आयोगElection Commission

न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी घेतला हा निर्णय

२ मे रोजी पाच राज्यांतील निवडणुकींचे निकाल

नवी दिल्ली:

मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) कठोर पाऊल उचलले आहे. दोन मे रोजी होणाऱ्या पाच राज्यातील मतमोजणीसंदर्भात महत्वाच्या निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी नियमावली जाहीर करण्यात करण्यात आली आहे.

Title Name
हनुमानाचा जन्म कुठे? आंध्र प्रदेशात, कर्नाटकात की अंजनेरीत
निवडणूक आयोग

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी या पाच राज्यांचा निकाल २ मे रोजी जाहीर होईल. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकांसाठी मोठ्या प्रचारसभा व रोड शो झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगाल व तामिळनाडूत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगास फटकारत तुम्हीच कोरोना वाढीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, असा संताप व्यक्त केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने नियमावली तयार केली. २ मे रोजी मतमोजणी केंद्रांवर उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तींनाच हजर राहण्याची मुभा असेल, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.

काय होती मद्रास न्यायालयाची टिप्पनी

उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी करत संताप व्यक्त केला आहे. देशात वाढत्या करोना प्रादुर्भावाची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन थेट निवडणूक आयोगालाच फटकारले आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, असा संताप मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे.मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांनी एका सुनावणीवेळी हा संताप व्यक्त केला. देशभरात करोनाची दुसरी लाट येत असताना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना निवडणूक रॅली काढण्यास परवानगी दिली. तुमची संस्था कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

जनता जिवंत राहील तरच लोकशाही

तसेच, 'जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.' याचबरोबर, '२ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहात? अशी विचारणा करत, मतमोजणीवेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्ल्यूप्रिंट सादर करा, अन्यथा मतमोजणी रोखली जाईल, असा इशार देखील निवडणूक आयोगाला दिला आहे.

मतमोजणी थांबण्याचा इशारा

राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com