ऑक्सिजन वाहतूक निर्बंधमुक्त

औद्योगिक वापरावर पूर्ण बंदी : केंद्र सरकारचे निर्देश
ऑक्सिजन वाहतूक निर्बंधमुक्त

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

देशभरातील कोविड रुग्णालयांमध्ये मेडिकल ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्देश दिले आहेत की, ऑक्सिजन वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. कोणत्याही एका राज्यासाठी पुरवठा मर्यादित ठेवला जाऊ शकत नाही. केंद्र सरकारने याचबरोबर ऑक्सिजनच्या औद्योगिक वापरावर पूर्णपणे बंदी केली आहे.

उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकार करोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यानदेखील ऑक्सिजनचा पुरवठा अडवत आहेत आणि दिल्लीत ऑक्सिजनचा साठा झपाट्याने संपत आहे, अशी तक्रार दिल्ली सरकारने केल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्देश देण्यात आले की, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्याही अडवणूकविना वाहतुकीस परवानगी असेल.

केंद्र सरकारने म्हटले आहे की, ऑक्सिजन पुरवठादार किंवा उत्पादकांवर राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या रुग्णालयांनाच पुरवठा करण्यासाठी कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. मेडिकल ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना कोणत्याही प्रकारे अडवता येणार नाही.दिल्लीत ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दिल्ली उच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी झाली. यावेळी सांगण्यात आले की,आता एक आदेश जारी करण्यात आला आहे की, कुठेही ऑक्सिजन वाहतुकीस रोखता येणार नाही. केंद्राचा आहे आदेश सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com