Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशदिशा रवीला जामीन : जाणून घ्या काय आहे टूलकिट

दिशा रवीला जामीन : जाणून घ्या काय आहे टूलकिट

नवी दिल्ली

शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिट प्रकरणात अखेर दिशा रवीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या ९ दिवसांपासून कारागृहात राहिलेल्या दिशाला दिल्लीच्या पतियाळा येथील हाउसकोर्टाकडून एक लाखाच्या खासगी जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात कोर्टाने तपास यंत्रणेस फटकारले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सऐप ग्रुप करणे किंवा टूलकिट एडिट गुन्हा नाही. तपास संस्था केवळ अंदाजावर लोकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे दिशाला कोठडीत ठेवण्याचे कोणतेही करण नसल्याचे न्यायालयाने म्हटले.

टूलकिट म्हणजे काय?

एखादा मुद्दा समजावून सांगण्यासाठी टूलकिटचा वापर केला जातो. टूलकिट हे कोणताही मुद्दा समजून घेण्यासाठी बनवलेलं गुगल डॉक्युमेंट असते. यात केवळ माहिती नसते. तर संबंधित मुद्यासंदर्भात आपल्याला नेमकं काय करायचंय? कसं करायचं हेसुद्धा सांगितलं जातं. थोडक्यात काय तर या गुगल डॉक्युमेंटमधे ऍक्शन पॉईंट असतात. एखादे आंदोलन, निदर्शने, आणि त्याच्याशी संबंधित माहिती या टूलकिटद्वारे दिली जाते.विशिष्ट विषयाची सविस्तर माहिती असते. एखादी याचिका, आंदोलन याबद्दलची माहिती अनेकदा टूलकिटच्या माध्यमातून दिली जाते. यामुळे आंदोलनात टूलकिटला अतिशय महत्त्व आहे.

अमेरिकेतल्या ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ ‘ऑक्यूपाय वॉल स्ट्रीट’ या आंदोलनातून टूलकिट चर्चेत आलं. तसंच कोरोना काळातलं ‘अँटी लॉकडाऊन प्रोटेस्ट’, ‘क्लायमेट स्ट्राईक कॅम्पेन’ अशा आंदोलनांमधेही टूलकिटचा वापर करण्यात आला. आपल्या आंदोलनाचं स्वरूप लोकांपर्यंत पोचावं हा त्यामागचा खरा उद्देश. त्यामुळे जगभरातले लोक या आंदोलनाशी जोडले गेले. ही आंदोलनं जगभर पसरली.

दिशाचा टूलकिटशी काय संबंध?

पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गसोबत दिशा रवीने शेअर टूलकिट डॉक्युमेंट शेअर केले होते, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. २६ जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान हिंसाचार झाला. त्या कटात दिशाचा सहभाग होता. ती या कटाच्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोपदेखील पोलिसांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या