देशात ऑक्सिजन मृत्यू : केंद्र- राज्य सरकारचे राजकारण


देशात ऑक्सिजन मृत्यू : केंद्र- राज्य सरकारचे राजकारण

नवी दिल्ली

कोरोना (corona) संसर्गाच्या काळात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला अशी नोंद नसल्याचे केंद्र सरकारने (Central goverment) सांगितल्यानंतर देशात नवा वाद निर्माण झाला आहे. या विषयावर नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारवर चौफर टीका होत असतांना भाजपने (Bj[) हे प्रकरण राज्य सरकारांवर शेकले आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेत माहिती दिल्याचे भाजपने म्हटले आहे. यावेळी ऑक्सिजनअभावी (oxygen) मृत्यू न झाल्याचं प्रतिज्ञापत्र खुद्द महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) सादर केल्याचं भाजपचे प्रवक्त संबित पात्रांनी सांगितलं.


देशात ऑक्सिजन मृत्यू : केंद्र- राज्य सरकारचे राजकारण
IMD राज्यातील पाच जिल्ह्यात रेड अलर्ट, नाशिकसाठी काय ?

ऑक्सिजनच्या अभावी देशात एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं धक्कादायक उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड संतापले असून त्यांनी थेट सरकार विरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

संजय राऊत म्हणाले की, ऑक्सिजन अभावी एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या व्यक्तींच्या परिवारांनी केंद्राविरोधात खटला दाखल करावा. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ते सत्य आहे, असंही ते म्हणाले.

भाजपचे संबित पात्रा मैदानात

संबित पात्रा यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या मुद्द्यावरून संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारवर देखील टीकास्त्र सोडलं आहे. “संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात”, असं संबित पात्रा म्हणाले आहेत.

महाराष्ट्र सरकारचे प्रतिज्ञापत्र

दरम्यान, यावेळी ऑक्सिजनअभावी मृत्यू न झाल्याचं प्रतिज्ञापत्र खुद्द महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्याचं संबित पात्रांनी सांगितलं. “महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्रात हे सांगितलं आहे की महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झालेला नाही. ज्यांचे मृत्यू झाले, त्यांच्याच नातेवाईकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारणा केल्यानंतर त्यावर राज्य सरकारनं उत्तर दिलं आहे”, असं ते म्हणाले.

केंद्र सरकार नेमके काय म्हणाले ?

नरेंद्र मोदी सरकारने, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात, राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी, "ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अहवालात दिलेली नाही," असं लेखी उत्तरात म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com