<p>नवी दिल्ली</p><p>कोरोनाविरुद्ध भारतात सध्या दोन लस उपलब्ध आहेत. एक 'कोव्हिशिल्ड' तर दुसरी 'कोव्हॅक्सिन' असा पर्याय आहे. परंतु नागरिकांना हे पर्याय मिळतील का? याचे उत्तर आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहे.</p>.<p>भारतात लस घेणाऱ्या व्यक्तीला 'कोव्हिशिल्ड' किंवा 'कोव्हॅक्सिन' असा पर्याय मिळणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले. एखादा लाभार्थी किंवा राज्याला हा पर्याय मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाच्या साप्ताहिक बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. </p><p>जगभरातील अनेक देशांमध्ये एकाहून अधिक लशींचा प्रयोग केला जात आहे. कोणत्याही देशाने आपल्या लाभार्थी नागरिकांना अशा पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही' असे स्पष्टीकरणही राजेश भूषण यांनी दिले.</p>