नाशिकला 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'ची यंदा गरज नाही; हे आहे कारण...

नाशिकला 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'ची यंदा गरज नाही; हे आहे कारण...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू असली, तरी जिल्ह्यात अद्यापही ऑक्सिजनची फारसी आवश्यकता निर्माण झालेली नाही. तशी परिस्थिती उद्भवली तरी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता असून, जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.... (nashik district self sufficient about oxygen)

एलएमओ (LMO), पीएसए (PSA) आणि सिलिंडर गॅस (Cylinder Gas) या तीनही माध्यमातून सध्या जिल्ह्यात ४९२ मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची उपलब्धता आहे. ऑक्सिजन पुरवण्याच्या विविध प्रकारांपैकी एक म्हणजे द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा (एलएमओ) वापर, एलएमओ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा अति जास्त शुद्धतेचा ऑक्सिजन असतो आणि मानवी शरीरामध्ये वापर करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात येते. जिल्ह्यात अशा प्रकारे ३५२.७८ मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.

त्यामुळे सध्या रुग्णवाढ जरी होत असली तरी ऑक्सिजन लावण्याची वेळ येत नाही. मात्र, दुसऱ्या लाटेचा अनुभव बघता तेव्हापासूनच जिल्हा ऑक्सिजनने समृद्ध करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाणे केलेलें होता. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय, (Government hospitals) निमशासकीय रुग्णालये (Semi government hospitals) ही ओक्सिजान्ने जोडली गेली आहे.

करोना विषाणूचा ओमिक्रोन (covid omicron variant) हा विषाणू संसर्गात सर्वाधिक असला तरी नागरिकांचे झालेले लसीकरण बघता त्याची तीव्रता तेवढी राहत नसल्याचे निरीक्षण समोर येत आहे. तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com