Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात लॉकडाऊन लागणार नाही; निर्बंध होणार कडक

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही; निर्बंध होणार कडक

मुंबई | प्रतिनिधी Nashik

राज्यातील करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. (Covid figures increased) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy chief Minister Ajit Pawar), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Dr Rajesh Tope) आणि टास्कफोर्सच्या एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. (Task Force Meeting) या बैठकीत लॉकडाऊन लागणार नसल्याची प्राथमिक माहिती आहे….

- Advertisement -

दररोज २५ हजार पेक्षा अधिक रुग्ण सापडतील अशी शक्यता आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. असे असले तरीदेखील अर्थकारण थांबणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचा सुरु आजच्या बैठकीत निघाला.

आजची बैठक आणि एकूणच करोनाची परिस्थिती याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना आज पाठविण्यात येणार आहे. (Covid situation report send to cm udhav thakaray) यानंतर लगेचच कठोर निर्बंधांवर चर्चा होईल. आजच मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

शाळांबाबत होणार आज निर्णय

महाविद्यालये बंद करण्याबाबतची मागणी कुलगुरूंनी केली आहे. त्यावर आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही आज महत्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर महाविद्यालये सुरु राहणार की ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु राहील यावर आज महत्वाची निर्णय होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या