Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशकरोना लसीकरणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

करोना लसीकरणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचे (COVID19) रुग्ण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात करोना लसीकरण (Corona Vaccine) मोहीम सुरु आहे. याच दरम्यान करोना लसीकरणावर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) करोना लसीकरणासाठी (Corona Vaccine) कोणत्याही व्यक्तीला सक्ती करता येणार नाही, असं म्हटलं आहे. शासन सार्वजनिक हितासाठी धोरण तयार करु शकतं, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

तसेच सुप्रीम कोर्टानं लस न घेतलेल्या लोकांसठी राज्य सरकारांनी, संघटनांनी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासंदर्भात लागू केलेले नियम मागं घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोना लसीकरणामुळं आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे याचा डाटा तयार करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. तर सोबतच सरकारला क्लिनिकल ट्रायल्सची आकडेवारी जाहीर करण्यासही सुप्रीम कोर्टानं सांगितले आहे.

करोना लसींच्या क्लिनिकल चाचण्या आणि लसीकरणानंतरच्या प्रकरणांवरील डेटा उघड करण्याचे निर्देश मागणाऱ्या जेकब पुलिएल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या