Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहेल्मेट नाही तर सहकार्य नाही

हेल्मेट नाही तर सहकार्य नाही

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा (Helmet) वापर वाढावा या हेतूने शासकीय (Govt), निमशासकीय कार्यालयांसह (Semi-government offices) शैक्षणिक संस्थामध्ये (Educational institution) येणार्‍या दुचाकीचालकांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ या धोरणानुसार 6 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला आहे. दिवाळीच्या (diwali) सुट्ट्या संपल्यानंतर उद्या सोमवारपासून शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू होणार आहेत. या ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. विनाहेल्मेट चालकास प्रवेश मिळाल्यास संबंधित आस्थापनाप्रमुखांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) दिले आहेत.

अपघातांमध्ये (accident) मृतांची संख्या कमी करण्यासोबतच सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई (Punitive action) केली जात होती. मात्र पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या आदेशानुसार 15 ऑगस्टपासून हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना सुरुवातीस पेट्रोल (petrol) न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍या चालकांचे ट्रॅफिक एज्युकेशन पार्क (Traffic Education Park) येथे समुपदेशन (Counseling) केले जात आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणून आता ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार शहरातील सर्व शासकीय-निमशासकीय, पेट्रोलपंप, शैक्षणिक आस्थापना, वाहनतळ येथे येणार्‍या दुचाकीचालकांना हेल्मेटचा वापर बंधनकारक झाला आहे.

या भागात आस्थापनाप्रमुखांना वाहनतळ व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही (cctv) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीसीटीव्ही आणि भरारी पथकांद्वारे पोलिसांकडून वेळोवेळी पाहणी केली जाणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालक आढळून आल्यास संबंधित आस्थापनाप्रमुख वा संबंधित अधिकार्‍यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 131(ब) (1) नुसार बाराशे रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

एखाद्या वाहनचालकाने वाद घातल्यास त्याच्यावरही कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. या निर्णयामुळे शहरातील शेकडो आस्थापना नियमांच्या चौकटीत आल्या आहेत. आस्थापनाप्रमुखांना या नियमाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या