नाशकात आता नो हेल्मेट नो इन्शुरन्स
नो एन्ट्रीतून जाणारच.

नाशकात आता नो हेल्मेट नो इन्शुरन्स


नाशिक | Nashik

अपघात टाळण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात झाल्यास जास्त हानी होऊ नये, यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik CP Office) माध्यमातून १५ ऑगस्टपासून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' (No Petrol No Helmet) ही मोहीम सुरू केली आहे.

मात्र, अनेक वाहनधारकांनी पेट्रोलसाठी चक्क भाड्याने हेल्मेट घेण्याची शक्कल लढवली असून त्यामुळे पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विनाहेल्मेट अपघात झाल्यास संबधितांना वैद्यकिय विमा (Medical insurance) देऊ नये, असा प्रस्ताव पोलिसांसमोर असून याबाबत पोलीस प्रशासनाकडून (Nashik Police Administration) गांभीर्याने विचार सुरू आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पाच वर्षाच्या कालावधीत ४६७ दुचाकीचालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातील ३९४ चालकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांच्या डोक्यास मार लागू त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांत आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय (Police Commissioner Dipak Pandey) यांच्या संकल्पनेतून 'नो हेल्मेट, नो पेट्रोल' ही मोहीम सुरू करण्यात आली.

१५ ऑगस्टपासून पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना हेल्मेट नसल्यास पेट्रोल देण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेकांनी यातून पळवाटा शोधत उसने हेल्मेट घेऊन पेट्रोल भरण्याचा जुगाड केला. काहींनी तर थेट भाड्याने हेल्मेट घेत पेट्रोल भरण्याची शक्कल लढवली. मात्र, ही मोहीम केवळ दंड वसुलीसाठी नसून नाशिककरांच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे आता ही मोहीम अधिक कठोर करताना ठोस उपाययोजना आखण्याच्यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून अभ्यास सुरू आहे.

अनेकदा अपघात (Accident) झाल्यानंतर विमा रकमेसाठी पोलीस पंचनामा द्यावा लागतो. मात्र यापुढे एखाद्याचा अपघात होवून तो जखमी झाला परंतु त्याच्याकडे जर हेल्मेट नसेल तर त्याला विम्याची रक्कमही मिळू शकणार नाही. या प्रस्तावाबाबत पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने विचार करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com