Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याNo Confidence Motion : "भाजप सरकारने भारताला..."; निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल

No Confidence Motion : “भाजप सरकारने भारताला…”; निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रातील मोदी सरकारविरोधात (Modi Government) विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला असून या प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेचा आजचा तिसरा दिवस असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणार आहेत. मात्र, त्याआधी अविश्वास प्रस्तावावर बोलतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला…

- Advertisement -

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी

यावेळी बोलतांना सीतारामन म्हणाल्या की, “भाजप (BJP) सरकारने भारताला नाजूक अर्थव्यवस्थेतून सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत बदलले आहे. भारत पोकळ आश्वासनांच्या युगात जगत नाही. परिवर्तन हे शब्दांतून नव्हे तर प्रत्यक्षात होते. तुम्ही लोकांना स्वप्नं दाखवलीत. आम्ही त्यांची स्वप्नं सत्यात उतरवली. आमचा सर्वांना सशक्त बनण्यावर विश्वास आहे. असे, निर्मला सीतारामन यांनी म्हटले.

Accident News : देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, पाच जखमी

पुढे बोलताना सीतारामन म्हणाल्या की, २०१३ मध्ये मॉर्गन स्टेनली या कंपनीने (Morgan Stanley) भारताचा जगातील सर्वात नाजूक अर्थव्यवस्थांच्या (Economies) यादीत समावेश केला होता. ज्या कंपनीने भारतीय अर्थव्यवस्था नाजूक असल्याचे घोषित केले होते, आज त्यांनीच भारताला अपग्रेड करून सर्वोच्च रेटिंग दिली आहे. फक्त ९ वर्षांत आमच्या सरकारच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. कोविड संकट येऊनही आर्थिक विकास झाला. आज घडीला भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधींवरील ‘फ्लाइंग किस’च्या आरोपाला कॉंग्रेसकडून जशाच तसं उत्तर; भाजप नेत्याचा Video केला शेअर

तसेच सीतारामन पुढे म्हणाल्या की, ” ‘बनेगा, मिलेगा’ सारखे शब्द आता वापरात नाहीत. आजकाल लोक कोणते शब्द वापरत आहेत? तर ‘बन गये, मिल गए, आ गये’. यूपीएच्या काळात लोक ‘बिजली आएगी’ म्हणायचे, आता लोक म्हणतात ‘बिजली आ गयी’. आधी ते म्हणायचे ‘गॅस कनेक्शन मिलेगा’, आता ते ‘गॅस कनेक्शन मिल गया’ असे म्हणतात विमानतळ ‘बनेगा’ असे नाही तर विमानतळ ‘बन गया’ असे म्हणतात”. असं म्हणत सीतारामन यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणातील ‘इतके’ शब्द कामकाजातून वगळले

- Advertisment -

ताज्या बातम्या