सचिन पायलट
सचिन पायलट
मुख्य बातम्या

पायलट गटास दिलासा; कारवाई न करण्याचे आदेश

पुढील सुनावणी २४ राेजी हाेणार

jitendra zavar

jitendra zavar

जयपूर। Jaypur

राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट (Sachin paylet) गटास दिलासा दिला आहे. अध्यक्षांनी दिलेल्या नाेटिसच्या विराेधात पायलट न्यायालयात गेले हाेते. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. तसेच २४ जुलैपर्यंत १९ आमदारांवर काेणतीही कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. आता या प्रकरणात पुढील सुनावणी २४ जुलै राेजी हाेणार आहे.

माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटाने विधानसभेचे अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी बजावलेल्या नोटिसीच्या विरोधात राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. तसेच २४ जुलैपर्यंत या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही दिले.

Deshdoot
www.deshdoot.com