नारायण राणे यांच्यावर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई करु नये- उच्च न्यायालयाचे आदेश

नारायण राणे यांच्यावर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई करु नये- उच्च न्यायालयाचे आदेश
उच्च न्यायालय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेले विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना भोवले आहे. मंगळवारी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात आज नारायण राणे यांनी हायकोर्टात (high court)याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.

उच्च न्यायालय
भुजबळांची 100 कोटींची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, किरीट सोमय्यांंचा दावा

नारायण राणेंविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्हे हे खोटे आहेत, असे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले आहे. या गुन्हयांविरोधात ही याचिका हायकोर्टात करण्यात आली आहे. राणेंवर जिथे गुन्हे दाखल आहेत तिथे जाण्याची गरज नाही. विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी देखील राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली. जोवर पुढची सुनावणी होत नाही तोवर कुठलंही विधान करू नये अशी मागणी देसाई यांनी केली. मात्र, राणेंचे वकील मानेशिंदे यांनी ही मागणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असे कोर्टात सांगितले. त्यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारची ही मागणी मान्य केली नाही. पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला घेण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com