महापालिका हद्दीतील पाण्यात 'इतक्या' लाख लिटरची वाढ

महापालिका हद्दीतील पाण्यात 'इतक्या' लाख लिटरची वाढ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गत वर्षी नाशिक शहरासह (nashik city) जिल्ह्यात चांगला पाऊस (Rain) पडला होता, त्यामुळे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणांमध्ये सध्या मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे....

दरम्यान, सध्या शहरात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पाणी उपलब्ध करून देणे हे महापािलकेची जबाबदारी असते, म्हणून वाढत्या मागणीप्रमाणे मनपाने (NMC) शहरात ५० लाख लिटर पाण्यात वाढ केली आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याच्या मागणीत वाढ होते. धरणसाठ्यातील पाणी लक्षात घेता महापािलकेकडून पाण्याचे नियाेजन करून त्या प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येताे. गत वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात गंगापूर (Gangapur) व मुकणे धरणात (Mukane Dam) पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने पाणी कपातीचे संकट आले नाही.

सद्यस्थितीत वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढली असून मनपा पाणी पुरवठा विभागाने त्यादृष्टीने अधिक पाण्याचे नियाेजन केले आहे.

दरराेज ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवले असून त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईतून सुटका हाेणार आहे. शिवाजीनगर फिल्ट्रेशन प्लॅन्ट येथून १२० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत हाेते.

सध्या या ठिकाणाहून ४ दशलश लिटर म्हणजेच ४० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे. तर मुकणे धरणातून १३२ ऐवजी १३३ दशलक्ष लिटर म्हणजेच दरराेज १० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com