प्रभाग सभापतीपदांचे उद्या चित्र होणार स्पष्ट

प्रभाग सभापतीपदांचे उद्या चित्र होणार स्पष्ट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) सहापैकी पूर्व विभाग सभापतीपद भारतीय जनता पक्षाने बिनविरोध काबीज केल्यानंतर उर्वरित पाच प्रभागांमध्ये सभापती ( Ward Committee Chairman) पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. सातपूर प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ( MNS ) सभापती शक्य आहे. तर पंचवटीत देखील रस्सीखेच सुरू आहे. राजकीय पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी तोडगा काढण्यासाठी सतत बैठका घेत आहे.

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपासह सर्व पक्षांचे उमेदवार मोर्चेबांधणी करीत आहेत. गुरुवारी नामनिर्देशन दाखल करण्याच्या वेळी पूर्व भागातून भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 30 च्या नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध जाहीर होणार आहे. तसे पाहिले गेले तर या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. एकोणावीस पैकी 12 सदस्य भाजपचे असल्याने या ठिकाणी भाजपचाच सभापती होणार होता, मात्र विरोधकांनी अर्ज न भरल्यामुळे ही जागा बिनविरोध झाली आहे.

सातपूर प्रभाग समिती सभापती पदासाठी शिवसेनेतर्फे मधुकर जाधव, तर मनसेतर्फे योगेश शेवरे यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले आहेत. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर मनसेनेचे शेवरे हे सभापती होणार अशी शक्यता आहे. पंचवटी विभागात 24 पैकी भाजपचे 19 सदस्य असून पैकी शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त असल्यामुळे सध्या 18सदस्य आहेत. तर अपक्ष 2, मनसे 2 आणि सेना 1 असे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमत असल्याने सभापतीही भाजपचाच होणार हे मात्र निश्चित आहे.

पंचवटी प्रभाग सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, पूनम सोनवणे यांनी अर्ज भरले असून अखेरच्या क्षणी कोण कोण माघार घेतो याकडे लक्ष लागून आहे. 19 जुलै रोजी एक-एक तासाच्या अंतरावर ऑनलाईन पद्धतीने सभापती पदाची निवडणूक होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com