Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा ओबीसी आरक्षण सोडत आज

मनपा ओबीसी आरक्षण सोडत आज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या ( NMC Election) दृष्टीने प्रशासनाने नव्याने लागू झालेल्या ओबीसी आरक्षणाची सोडत ( OBC Reservation Draw )आज (दि.29) महाकवी कालिदास कलामंदिरात काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता काढण्यात येणार्‍या या सोडतीची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बघता येणार असल्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणूकांच्या दृष्टीने प्रशासनाने त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत तयार केली. त्यानंतर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर आलेल्या हरकतींचा निपटारा करून अंतिम मतदार यादी सुद्धा प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर यापूर्वी महिला व अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण सुद्धा काढण्यात आले होते.

आता नव्याने ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याने 27 टक्के आरक्षण देण्यासाठी ही सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत दरवेळी प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी नागरिक, राजकीय नेते उपस्थित राहता येणार असून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सोडत पाहता येणार असल्याचे उपायुक्त घोडे पाटील यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या