Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकभूसंपादन विषयी आक्षेपांना द्विपक्षीय पाठींबा; महासभा गाजली

भूसंपादन विषयी आक्षेपांना द्विपक्षीय पाठींबा; महासभा गाजली

नाशिक | प्रतिनिधी

भूसंपादनाच्या विषयावरून आजची स्थायी समितीची सभा प्रचंड गाजली. भाजपचे सदस्य मुन्ना हिरे यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना शिवसेना पाठोपाठ मनसेने देखील पाठिंबा दिल्याने भूसंपादनाचा विषय तहकूब करावा लागला. सभेत अनेक विकास कामांना मंजुरी देण्यात आली…

- Advertisement -

स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पद्धतीने महापालिकेची स्थायी समितीची सभा झाली. यावेळी अनेक विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.

यामध्ये महापालिका आयुक्त यांचेकडील पत्राच्या नुसार भूसंपादन केस क्रमांक 50/ 2017 नाशिक येथील सर्वे नंबर 993/ 2 चे क्षेत्र 24 40 चौरस मीटर व सर्वे नंबर 994/2ब चे 455 चौरस मीटर असे एकूण 2895 चौ. मी. मध्ये 18 मीटर रुंद विकास योजना रस्त्याकरिता 7 कोटी 53 लाख पेक्षा जास्त रक्कम उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या कार्यालयाकडे जमा करण्याचा प्रस्ताव आजच्या स्थायी समिती सभेत ठेवण्यात आला होता. यावर सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्या.

भाजपचे मुन्ना हिरे यांनी हा विषय संवेदनशील असून चर्चा होऊनच त्याला मंजूर करण्याची मागणी करत हा विषय तहकूब करण्याची मागणी केली. जनतेचा पैसा योग्य रीतीने वापर व्हावा, सर्व प्रकारचे तांत्रिक बाजू तपासून घ्यावेत, या नंतर डॉकेत ठेवण्यात यावा. भूसंपादन झाल्यास जनतेच्या काय फायदा होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी शासन आदेश सांगत एकूण रकमेपैकी फक्त तीस टक्के रक्कमच महापालिकेला भरणे बंधनकारक आहे असे नमूद केले. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी देखील या विषयात अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगत विषय तहकूब करण्याची मागणी केली.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख यांनी देखील रस्ता आरक्षणाला विरोध नाही, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या प्रस्ताव याला तांत्रिक बाबी विचार करून अभ्यास करून मंजुरी द्यावी, तोपर्यंत विषय तहकूब ठेवावा, अशी मागणी केली.

यामुळे सभापती गीते यांनी हा विषय तहकूब करीत अधिकाऱ्यांना अभ्यास करून सादर करण्याचे आदेश दिले.

नाशिक पूर्व विभागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय करिता ऑक्सीजन टॅंक बसविण्यासाठी फाउंडेशन तयार करू मक्तेदार यांच्याकडून करून घेण्यात आल्याने त्यासाठी होणारे 17 लाख 35 हजार 405 रूपये करण्यास कार्योत्तर मंजुरी ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे राहुल दिवे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले तर महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी केली. कोणाच्या चुकीमुुळे दुर्घटना झाली याबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

त्याचप्रमाण महापालिकेने कोट्यवधी रूपये खर्चून बिटको रुग्णालय आधुनिकीकरण केले. या ठिकाणी अनेक सुविधा नागरिकांना मिळत नाही, लस घेण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना योग्य वागणूक मिळत नाही.

याठिकाणी फिजिशियन नाही, आयसीयु देखील बंद आहे. म्हणून येथील स्टाफ थेट जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठवतात, अशी तक्रार केली तसेच काही डॉक्टर मनमानी कारभार करतात त्यांची त्या ठिकाणाहून त्वरित बदली करण्याची मागणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या