Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकमध्ये आआपा चमत्कार घडवणार?

नाशिकमध्ये आआपा चमत्कार घडवणार?

नाशिक । वैभव कातकाडे, फारूख पठाण Nashik

दिल्ली डायलॉगवर आधारित असलेले आणि सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून आगामी महापालिका निवडणूक Upcoming NMC Election लढविण्याचे आम आदमी पार्टीने Aam Aadmi Party ठरविले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर कुठला मुद्दा असेल तर तो जाहीरनामा. इतर पक्षांच्या दृष्टिकोनातून सर्व शहर असा जाहीरनामा मांडला जात आहे तर आम आदमी पार्टीतर्फे 44 प्रभागांचे 44 जाहीरनामे तिथल्या जनतेला विचारून तयार करण्यात येणार आहे आणि त्यावरच लक्ष केंद्रित करुन ही निवडणूक लढविली जाणार आहे.

- Advertisement -

आगामी महापालिका निवडणुकीत जागांवर 133 उमेदवार देण्याचे आम आदमी पार्टीने ठरविले आहे. उमेदवार देताना सर्वसामान्य माणूस असा निकष त्यांनी लावलेला आहे. यामध्ये त्या उमेदवाराला सर्वतोपरी प्रयत्न, प्रचार तसेच त्याच्या प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी पोहोचणे, त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय करता येऊ शकेल याबाबत विश्वास निर्माण करून देणे हा महत्त्वाचा अजेंडा असणार आहे.

आतापर्यंत शहरात आम आदमी पार्टीने आपल्या 34 उमेदवारांची यादी देखील प्रकाशित केली आहे. या यादीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असल्याने उमेदवार हा सर्वसामान्य असावा हा निकष कुठेतरी ते पूर्ण करताना दिसत आहे. या यादीत दोन टेलर, एक दुकानदार अशा सर्वसामान्यांचा समावेश आहे.

नाशिक महापालिकेच्या रचनेबाबत विचार करता दिल्लीतील निवडणुकांच्या वातावरणापेक्षा महाराष्ट्रातील निवडणुकांची समीकरणे येथील प्रतिस्पर्धी पक्षीय राजकारण या बरीच तफावत असते. असे असून देखील महाराष्ट्र आआपच्या समितीने निर्णय घेत जवळपास महानगरपालिका निवडणुकीसाठी तयारीच्या दृष्टीने रणनीती आखली आहे. त्यातच नाशिक महानगपालिकेसाठी दिल्ली मॉडेल वर व्यूहरचना तयार करण्यात आली आहे.

यामध्ये पक्षाकडून निवडणुकीसाठी देण्यात येणारे उमेदवार हे पक्षाची ध्येय धोरण पोहचविणारे लोकं, समाजासाठी प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते यांच्यासोबत इतर विरोधी पक्षातील तळागळातील मेहनती असून कायम डावलले गेलेले कार्यकर्ते यांच्यातून निवडण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने घराणेशाही मुक्त, अनधिकृत धंदे चालवणार्‍या लोकांना टाळण्यात आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. हे करतांना पक्षाकडून करप्ट, क्रिमिनल आणि कम्यूनल पार्श्वभूमी असणार्‍याना तिकीट देताना पूर्णपणे डावलण्यात येत आहे.

शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले होते. याबाबत लवकरच निर्णय घेऊन आम आदमी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. कार्यकारिणी नसली तरी पक्ष समिती आतापर्यंत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर पेलत आहे. सध्यातरी आम आदमी पक्षाचे चाललेला प्रचार बघता हा पक्ष महापालिकेत येऊन चमत्कार घडवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सपा, एमआयएमकडून उमेदवार चाचपणी

महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी वेग दिला आहे. मोठ्या पक्षांसह छोट्या पक्षांची तयारी देखील जोरदारपणे सुरू झाली आहे. तर समाजवादी पार्टी Samajwadi Party तसेच एमआयएमच्या MIM स्थानिक पदाधिकार्‍यांनी देखील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दलित, मुस्लीम तसेच परप्रांतीय मतदारांवर या दोन्ही पक्षांची भिस्त आहे. ज्या प्रभागात दलित, मुस्लीम व परप्रांतीय मतांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी हे दोन्ही पक्ष आपले उमेदवार देतील अशा प्रकारे नियोजन सुरू आहे.

छोट्या पक्षांमुळे मोठ्या पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. महानगरपालिका निवडणुकीसाठी आता फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे काही लहान पक्षांनी देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य नाशिक, सातपूर व नाशिक रोड आदी भागात या पक्षांचे उमेदवार राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

एमआयएम पक्षाच्या वतीने देखील निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. एमआयएमने नव्याने नाशिकला शहराध्यक्ष दिला असून यामुळे मागील काही काळात पक्षसंघटन देखील मजबूत होतांना दिसत आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी यांची सभा देखील नाशिकमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.मोठ्या पक्षातील दिग्गज उमेदवारांसमोर छोट्या पक्षातील उमेदवार कडवे आव्हान उभे करू शकतात, असा आजवरचा अनुभव आहे. तसेच राजकारणात कोणत्याही प्रकारची कमतरता ठेवण्यात येत नाही. यामुळे ऐनवेळेपर्यंत काय होते हे सांगणे कठीण असले तरी समाजवादी पार्टी तसेच एमआयएम पक्ष नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्याचे दिसत आहे.

राज्यात तयार झालेल्या शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. तर आगामी महापालिका निवडणुका देखील आघाडी म्हणून लढणार असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. तरी यामध्ये नाशिक महापालिकेत समाजवादी पार्टीला स्थान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे एमआयएम पक्षाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय दिसत नाही. मागच्या वेळेला वंचित आघाडी म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र यंदा अशी कोणत्याही प्रकारची चर्चा नसल्यामुळे एमआयएम स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या